शेलू (खुर्द) येथे वीज पडून दोन जनावरं ठार

शेतकरी हवालदिल, शासकीय मदतीची मागणी

शिंदोला: वणी तालुक्यातील शेलू (खुर्द) येथील वर्धा नदीच्या किनाऱ्यालगत असलेल्या एका शेतात सोमवारी वीज पडून दोन जनावरं ठार झाल्याची घटना घडली.

वणी तालुक्यात सोमवरला दुपारी एक वाजता विजांच्या कडकडाटासह  पाऊस पडला.यात शेलू(खुर्द) येथील शेतकरी गुलाब बापूजी काकडे यांच्या शेतात वीज पडून चरत असणारी एक गाय आणि एक बैल ठार झाले.

तलाठ्यानी घटनेचा पंचनामा केला आहे. या घटनेत काकडे यांचे 75000 रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. घटनास्थळीच दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. सदर घटनेने आधीच संकटात सापडलेला शेतकरी  हवालदिल झाला आहे.त्यानी शासकीय मदतीची मागणी केली आहे.

 

shelu khurdShindola
Comments (0)
Add Comment