विवेक तोटेवार, वणी : माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना (उद्धव बालासाहेब ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस गुरुवार 27 जुलै रोजी युवासेनेद्वारा समाजिक व पर्यावरणपूरक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. युवासेना वणी शाखा तर्फे शिरपूर येथे गरजूंना छत्रीचे वाटप करण्यात आले. तसेच शासकीय कार्यालयात रोपट्यांचे वाटप करून वाढदिवस साजरा करण्यात आला.
सध्या पावसाळा सुरू असल्याने तालुक्यातील शिरपूर येथे गरजवंतांना 200 छत्रीचे वाटप करण्यात आले. तसेच शासकीय कार्यालयात गुलमोहर रोपट्यांचे वाटप करण्यात आले. सकाळी 8 वाजतापासून कार्यक्रमाला सुरुवात झाली. सदर कार्यक्रम हा युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे यांच्या माध्यमातून घेण्यात आला. वणीत सुद्धा काही गरजूंना छत्री वाटप करण्यात आली.
यावेळी युवासेना उपजिल्हा प्रमुख अजिंक्य शेंडे, राजु वाघमारे, सचिन भोयर, लक्ष्मण डावरे, सतिश प्रफुल बोरडे, मयूर नागपुरे, सचिन करमळर, नयन कैराती, शत्रुघ्न मालेकर, राकेश मालेकर, चेतन उलमाले, निलेश ठमके, युवराज नागपुरे, प्रवीण गिरोले, यश बोबडे, राहुल सूर्यवंशी, ललित पोतराजे, मारुती गिरोले, दीपक मत्ते, शंकरजी गुरनुले, प्रवीण खोबरे, श्रीकांत वाढई, किशोर ठाकरे, कुणाल डोंगरकर, गोपाल वाढई, महादेव ठमके, अविनाश कोंगरे उपस्थित होते.