सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील माजी सरपंच शंकर दत्तात्रय लाकडे यांची लहान बंधू सुनील दत्तात्रय लाकडे वय 40 यांचे बुधवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले. गेल्या तीन चार दिवसांपासून त्यांच्यावर यवतमाळ येथे शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होता. परंतु उपचारा दरम्यान काल रात्री (28 एप्रिल) त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई पत्नी दोन मुली असा आप्त परिवार आहे. सुनील यांची मनमिळवू स्वभावाची व्यक्ती म्हणून ओळख होती. त्यांच्या अकाली जाण्यामुळे मित्र परिवारात व मुकुटबन परिसरात शोककळा पसरली आहे.
हे देखील वाचा:
सावधान….! लॉकडाउनच्या नियमांचा भंग करणाऱ्या 36 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कोरोना विस्फोट, आज तालुक्यात 168 रुग्ण तर 63 व्यक्तींची कोरोनावर मात