नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील धामणी येथील राजू हरी बावने (19) या तरुणाने 28 जानेवारीचे संध्याकाळी गावा जवळील नरसाळा धरणात उडी घेऊन आत्महत्या केली. सहा महिन्यांपूर्वी मृतकाच्या आजोबांनीही याच धरणात उडी घेऊन जीवणयात्रा संपवली होती.
राजू गावातच पानटपरीचा व्यवसाय करायचा तर आई वडील मोलमजुरी करुन उदरनिर्वाह करायचे. गुरुवारी दिनांक 28 जानेवारी रोजी संध्याकाळी सात वाजताच्या दरम्यान राजू अचानक मी गावाला जातो म्हणून घरुन धरणाकडे पळत सुटला. कुटूंबियांना शंका आल्याने गावातील काही तरुणांच्या मदतीने त्याचा पाठलाग केला. परंतू तो पर्यंत त्याने धरणात उडी घेतली.
रात्रीच राजूचा शोध घेण्यास सुरुवात झाली. मात्र त्याचा काही शोध लागला नाही. मात्र आज दुपारी एक वाजताच्या सुमारास राजूचे प्रेत पाण्यावर तरंगताना दिसले. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन राजूच्या मृत्यूची नोंद केली.
आत्महत्येचे कारण अजुन समोर आले नाही. विशेष म्हणजे सहा महिन्यापूर्वी मृतक राजू्चे आजोबा निळकंठ चिमणा भडके (65) यांनी सुध्दा याच धरणात याच वेळेवर आत्महत्या केली होती.
हे देखील वाचा: