मारेगाव येथे महात्मा ज्योतिबा फुलेंना अभिवादन

माळी महासंघ व नागरीकांचा पुढाकार

ज्योतिबा पोटे, मारेगाव: महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्य येथील जिजाऊ चौकात माळी महासंघ तालुका शाखा मारेगाव व शहरातील नागरिकांच्या वतीने स्मृती दिनानिमित्य अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. सकाळी नऊ वाजता हा कार्यक्रम झाला.

मारेगावचे तहसीलदार विजय साळवे व मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरिक्षक राऊत यांचे हस्ते फुलेंच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेडचे वणी विधानसभा अध्यक्ष अनंत मांडवकर, माळीमहा संघाचे कार्तिक शेंडे, ज्योतिबा पोटे, गवळी , अमोल शेंडे, सुधाकर लोनबले, नारायन शेंडे, मोहन शेंडे, संतोष शेंडे, हरिभाऊ बोढे, अनंत खाडे, विवेक बोबडे आदी कार्यकर्ते अभिवादन कार्यक्रमाला उपस्थित होते.

Mahatma PhuleMalisanghMaregaon
Comments (0)
Add Comment