मुकुटबनला मिळाला नवीन कोंडवाडा

आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या हस्ते उद्घाटन

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथील कोंडवाड्याचा उद्घाटन सोहळा पार पडला. वणी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. मुकुटबन येथील जनावरांचा कोंडवाडा गेल्या एक वर्षांपासून अडगळीत होता. आतील भिंती जीर्ण अवस्थेत होत्या. त्यामुळे कोंडावाडा कधीही खचण्याची शक्यता होती.

ग्रामपंचायतीने भिंती पाडून त्यावर नवीन बांधकाम केले. कोंडवाड्याला वॉलकंपाउंड व गेट लावण्यात आले व रंगरंगोटी करण्यात आली. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी 26 ऑक्टोबरला मुकुटबन येथील ग्रामपंचायतीला अचानक भेट दिली. सचिव व प्रशासक यांच्याशी विकास कामाबाबत चर्चा केली तसेच समस्या जाणून घेतल्या.

त्यानंतर आमदार बोदकुरवार यांच्या हस्ते कोंडवाड्याचे रितसर उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्रशासक संतोष गिरी, ग्रामविकास अधिकारी कैलास जाधव, ठाणेदार धर्मा सोनुने, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

KondwadaLead StoryMukutban
Comments (0)
Add Comment