कळमना-वनोजा पुलाजवळ अपघात 

दुचाकी चालक गंभीर जखमी

विलास ताजने, शिंदोला:  वणी वरून नांदा बीबी येथे जाण्याऱ्या तरुणाच्या दुचाकीला अपघात होऊन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना कळमना पुलाजवळ २८ ऑक्टोबरला सायंकाळी साडेसहा वाजता घडली.

प्राप्त माहिती नुसार लोकनाथ कोडापे वय (२३) हा युवक बीबी या आपल्या गावी दुचाकी क्र. एम.एच. ३४ एजी ६०६५ या दुचाकीने जात होता. पैनगंगा नदीच्या पुला जवळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे. समोरून येणाऱ्या वाहनाच्या प्रखर प्रकाशामुळे लोकनाथला रस्ता नीट दिसला नाही. त्यामुळे त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि तो कोसळला.

सदर अपघाताची माहिती कळमना येथील युवकांना कळताच रुग्णवाहिका बोलावून जखमीला उपचारासाठी रवाना करण्यात आले. शिंदोला ते कळमना या ८ किमी लांबीच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. सदर मार्गाने गडचांदूर परिसरात सिमेंटची वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. मात्र सदर रस्त्याच्या दुरुस्तीकडे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

KalmanaLead StoryVanoja
Comments (0)
Add Comment