एकाच दिवशी मायलेकाचा मृत्यू, सेवानगरात शोककळा

दोन दिवसांआधी वडीलचेही झाले होते निधन

विवेक तोटेवार, वणी: शहरातील सेवनगर येथे राहणाऱ्या एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा अवघ्या तीन दिवसांत मृत्यू झाला आहे. रविवारी मुलगा व त्याच्या आईचा तर त्याच्या दोन दिवसांआधी वडीलांचा मृत्यू झाला होता. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तींचा मृत्यू झाल्याने त्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

सेवानगर येथे राहणारे 51 वर्षीय व्यक्ती हे नगर पालिकेत सफाई कामगार म्हणून कार्यरत होते. गेल्या 22 वर्षांपासून ते सेवा देत होते. 10 दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना सावंगी मेघे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांची टेस्ट केली असता ती पॉसिटीव्ह आल्याची महिती आहे. प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरवर ठेवण्यात आले होते.

रविवारी रात्री 11.30 वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या मृत्यूच्या अवघ्या काही तास आधी रविवारी दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान त्यांच्या आईचे (72) आजाराने त्यांच्या राहते घरी सेवानगर येथे निधन झाले होते. एकाच दिवशी मायलेकांचा मृत्यू झाल्याने सेवानगरात शोककळा पसरली आहे.

शुक्रवारी वडिलांचा मृत्यू
मायलेकांचा मृत्यू होण्याआधी दोन दिवसांआधीच सफाई कामगार यांचे वडील (76) यांचा देखील मृत्यू झाला होता. त्या दु:खातून ते सावरले नसतानाच रविवारी आईचा मृत्यू झाला. त्याच्या काही तासानंतरच त्यांचा देखील मृत्यू झाला. 

सफाई कामगार पॉजिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी कोरोनाची चाचणी केली नव्हती अशी प्राथमिक माहिती आहे. सफाई कामगार यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा आप्तपरिवार आहे. सध्या त्यांचे मुलं आणि पत्नी यांची प्रकृती स्थिर आहे. अवघ्या तीन दिवसात एकाच कुटुंबातील 3 व्यक्तींचे निधन झाल्याने संपूर्ण वणी शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे

COronaLead StorySevanagar
Comments (0)
Add Comment