Video: मार्डी येथे बंद झालेल्या दारू दुकानातून दारूची सर्रास विक्री 

वणी बहुगुणीच्या हाती दारूविक्रीचा एक्सक्लुझिव व्हिडीओ
वणी: मारेगाव तालुक्यातील मार्डी येथील शासनानं बंद केलेल्या दारूच्या दुकानातून राजरोजपणे दारूविक्री होत असल्याचं समोर आलं आहे. या अवैध दारूविक्रीचा व्हिडीओ वणीबहुगुणी.कॉमच्या हाती लागला आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानं राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि मारेगाव पोलीस प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.

 

मार्डी येथे चार बार आणि दोन देशी दारूच्या भट्ट्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार येथील सहाही दारूचे दुकानं बंद झाले. त्यापैकी एका दारूच्या दुकानात राजरोसपणे दारूची अवैध विक्री सुरू आहे. हे सर्व प्रकार राजरोजपणे सुरू असून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी गप्प का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तसंच या अवैध दारू विक्रेत्याला राजकीयय पाठबळ तर मिळत नाही ना अशाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय.

(हे पण वाचा: नारीशक्तीचा विजय ! कायर येथील महिलांनी पकडली अवैध दारू)

एकूणच मार्डी येथील परवाना असलेले दारू दुकान बंद झाल्यावरही त्याच जागी अवैध दारूविक्री सुरू करून शासनाची चक्क दिशाभूल केली जात आहे. या गंभीर प्रश्नाकडे राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीस प्रशासन दुर्लक्ष करत असल्यानं आता खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष पुरविण्याची गरज आहे.

Illegal liquorLead Storyliquor BanMardiMaregaon PoliceWani Bahuguni Exclusive
Comments (0)
Add Comment