कायरः वणी तालुक्यातील शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणा-या कायर येथे महिलांनी अवैध दारू पकडली. कायर येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ होण्याच्या मार्गावर आहे. पोलीस कारवाई करत नाही म्हणून अखेर महिलांनीच अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करणा-याच्या घरावर धाड टाकली. यात दोन पेटी दारूच्या बाटल्या पकडून त्यांनी आरोपीला पोलिसांच्या स्वाधीन केलंय.
कायर परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्रीचा व्यवसाय सुरू आहे. याविरोधात गावातील काही महिलांनीच लढा देण्याचं ठरवल. सिंधू येलपूलवार, गीता मंदावार, माया पुसावार, गीता सनिदलावार सह 25 महिलांनी पिंटू गंधेशिरवार, दौलत वाघाडे यांच्या घरावर गुरुवारी चार च्या सुमारास धाड टाकली. यात त्यांनी दोन पेटी दारूच्या बाटल्यासह या दोघांना रंगेहात पकडलं..
(हे पण वाचा: कायर गावात राजरोसपणे अवैध व्यवसाय सुरू )
आरोपींना महिलांनी पोलीसांच्या ताब्यात दिलं. त्यानंतर शिरपूर पोलिसांचे डोळे उघडले. पोलिसांनी अवैध दारूविक्रेत्याविरूध्द कारवाई केल्याची माहीती आहे.