न. प. शाळांमध्ये सामाजिक न्यायदिन साजरा

देवेंद्र खरवडे, वणी: नगर परिषद वणी अंतर्गत येणाऱ्या 11शाळांमध्ये राजर्षी शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी करण्यात आली. सोबतच शाळेच्या पहिल्या दिवशी नवीन विद्यार्थ्यांचे पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले.

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा क्र 8 येथे प्रभातफेरी काढण्यात आली. तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक बंडू कांबळे यांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शाहू महाराजांच्या शैक्षणिक कार्याबद्दल माहिती दिली.

शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजू डोंगरे यांनी नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षिका चित्रा बावणे, ज्योती धुर्वे व किशोर चौधरी उपस्थित होते.

Lead StoryNagar palika schoolsamajik nyay din
Comments (0)
Add Comment