कोतवालांना शिपाई पदावर बढती द्या

विविध मागणीसाठी कोतवाल संघटनेचे निवेदन

बहुगुणी डेस्क, वणी: कोतवालांना चतुर्थश्रेणी बहाल करत त्यांना शिपाई पदावर बढती द्यावी तसेच जिल्ह्यातील वर्ग ड मध्ये पदोन्नतीस पात्र ठरलेल्या कोतवालांना दरमहा 15 हजार रुपये मानधन द्यावी या मागणीबाबत जिल्हाधिकारी यांना सोमवारी निवेदन देण्यात आले. यावेळी वणी आणि परिसरातून मोठ्या प्रमाणात कोतवाल संघटनेचे पदाधिकारी व सदस्य सहभागी झाले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून पात्र कोतवालांना शिपाई पदी बढती द्यावी यासाठी आदोलन करण्यात येत आहे. दरवर्षी त्यांना याबाबत आश्वासन देण्यात येते. मात्र त्यावर कोणतीही कार्यवाही होत नाही. मागणी मान्य करावी यासाठी कोतवाल संघटना विविध आंदोलन नेहमीच करतात. सोमवारी कोतवालांच्या विविध मागणींसाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.

या वेळी महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष अनिल मिलमिले, जिल्हा उपाध्यक्ष उत्तम पाचभाई, सचिव सुरेशराव येरमे, वणी ता. अध्यक्ष चंपत उइके, मारेगाव ता. सचिव अतुल बोबडे, वणी उपविभागीय अध्यक्ष बंडूजी लोहांडे, महादेव गाते, आनंदसिंग बैस, पि.व्ही. सावरकर, आर.एस. पेचे यांच्यासह मोठ्या संख्येने कोतवाल संघटनेचे सदस्य उपस्थित होते.

KotwalLead Story
Comments (0)
Add Comment