खडकी बुरांडा ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा

तालुक्यात प्रथमच राष्ट्रवादीने उघडले खाते

मारेगाव: रविवारी दिनांक 27 मे रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने झेंडा फडकवला आहे. मारेगाव
तालुक्यातील खडकी बुरांडा या ग्रामपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी अभूतपूर्व यश मिळवीत सरपंच, उपसरपंच तसेच सदस्यपदी विजय मिळवला आहे.

रविवारी झालेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीचा सोमवारी निकाल लागला. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचीत सरपंच भास्कर आत्राम यांनी सेनेचे शामा आत्राम यांचा 385 मतांनी परभव केला. शामा आत्राम यांना केवळ 84 मतांवर समाधान मानावे लागले. तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे सचिन वासेकर हे निवडून आले आहे. त्यांना 85 मते मिळाली. त्यांनी सेनेच्या दत्ता तिखट यांचा पराभर केला. तर सदस्यपदाच्या 7 जागांवरही राष्ट्रवादी काँग्रेसने विजय मिळवला आहे. विजयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मारेगाव येथील बस स्टॉप चौकातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत विजयी उमेदवारांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. अलिकडेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आपल्या खांद्यावर घेतलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस डॉ. महेंद्र लोढा यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवण्यात आली होती.

तालुक्यात पहिल्यांदाच राष्ट्रवादीने उघडले खाते
मारेगाव तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उमेदवारांनी खाते उघडत तालुक्यात मुहुर्तमेढ रोवली आहे. डॉ. लोढा यांनी पक्षाची जबाबदारी खांद्यावर घेताच पक्षाने जोरदार उभारी घेतली आहे. या विजयामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. तर दुसरीकडे पक्ष संपण्यात जमा झाल्याचे चित्र निर्माण झाले असताना डॉ. लोढा यांच्या नेत़त्वात पक्षाने घेतलेल्या नव्या उभारीमुळे इतर पक्षांचे धाबे दणाणले आहे.

Dr Mahendra lodhaKhadki BurandaLead StoryNCP
Comments (0)
Add Comment