कमलापूर येथील गरुजूंना अन्नधान्य वाटप

माजी सभापती प्रकाश म्याकलवार यांचा पुढाकार

सुशील ओझा, झरी: कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता संपूर्ण देश लॉकडाऊन करण्यात आले. लोकडाऊन मुळे गोरगरीब जनतेच्या हातातील कामे गेले रोजमजुरी बंद झाली ज्यामुळे तालुक्यातील आदिवासी गरीब लोकांच्या उदनिर्वाहाचा प्रश्न गंभीर झाला आहे. उपासमारीची वेळ आली आहे. कमलापूर येथील गरीब व गरजू लोकांना आधार मिळावे याकरिता सामाजिक कार्यकर्ते तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश म्याकलवार यांनी पुढाकार घेऊन अन्नधान्य वाटप करण्याचे ठरविले.

माजी आमदार वामनराव कासावार यांच्या हस्ते व प्रमुख उपस्थितीत तहसीलदार जोशी गटविकास अधिकारी सुधाकर जाधव प्रकाश म्याकलवार मारोती येडमे व प्रतिष्ठित च्या हस्ते २५ कुटुंबियांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.

KamalapurLead StoryPrakash MyakalwarZari
Comments (0)
Add Comment