तालुक्यात कोरोना बॉम्ब, एकाच दिवशी 31 पॉजिटिव्ह

शहरात 13 रुग्ण तर ग्रामीण भागात 18 रुग्ण

जब्बार चीनी, वणी: आज तालुक्यात कोरोनाचा विस्फोट झाला. आज तब्बल 31 रुग्ण आढळून आलेत. आज आलेल्या रुग्णांमध्ये वणी शहरात 13 तर  18 रुग्ण ग्रामीण भागात आढळून आलेत.

वणी शहरात विठ्ठलवाडी येथे 3, सर्वोदय चौक व राजीव गांधी चौक येथे प्रत्येकी 2 तर शास्त्रीनगर, ढुमेनगर, गुरुनगर टागोर चौक, सेवानगर, माळीपुरा येथे प्रत्येकी 1 रुग्ण तर ग्रामीण भागात मुर्धोणी येथे 5 चिखलगाव, लालगुडा व गणेशपूर येथे प्रत्येकी 2 तर मंदर, शिरपूर, गणेशपुर, उकणी, वागदरा, माणकी, रासा येथे प्रत्येकी एक व वरोरा येथील 1रुग्ण आढळून आलेत.

रविवारी दिनांक 28 मार्च रोजी 124 संशयीतांचे रिपोर्ट यवतमाळहून प्राप्त झालेत. यात 27 व्यक्ती पॉजिटिव्ह तर 97 व्यक्ती निगेटिव्ह आल्यात. आज 189 संशयीतांची रॅपिट ऍन्टीजन टेस्ट करण्यात आली. यात 4 व्यक्ती पॉजिटिव्ह आलेत तर 185 व्यक्ती निगेटिव्ह आलेत. आज आलेल्या रुग्णांवरून 40 संशयीतांचे स्वॅब यवतमाळ येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले. अद्याप यवतमाळहून 790 संशयीतांचे रिपोर्ट येणे बाकी आहे. आज 3 कोरोनामुक्त व्यक्तींना सुटी देण्यात आली.

सध्या तालुक्यात 84 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. यातील 22 रुग्ण होम आयसोलेट आहेत. तर 43 रुग्ण कोविड केअर सेंटरला उपचार घेत आहेत. 19 रुग्णांवर यवतमाळ व इतर ठिकाणी उपचार सुरू आहे. तालुक्यात कोरोनाचे एकूण 1443 रुग्ण आढळून आलेत. यातील 1333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 26 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. (यात बाहेरगावी उपचार सुरू असताना मृत झालेल्या रुग्णांचा समावेश नाही.)

Corona Update WaniLead Story
Comments (0)
Add Comment