संजय देरकर यांच्यावर सोपविली पक्षानं मोठी जबाबदारी

शिवसेना (उ.बा.ठा) पक्षाच्या वणी विधानसभा प्रमुख पदी नियुक्ती

बहुगुणी डेस्क, वणी: वणी विधानसभा क्षेत्रातील खंबीर नेतृत्व म्हणून संजय दरेकर यांच्याकडे पाहिले जाते. अनेक वेळा विधानसभा लढण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. त्यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. वेळोवेळी समाजातील वंचित शोषित घटकांना न्याय मिळवून देण्याचे काम संजय देरकर गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे.

अशातच गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना (उ.बा.ठा) या पक्षात जाहीरपक्ष प्रवेश केला. त्यांच्यावर नुकतीच पक्षनेतृत्वाने वणी विधानसभा प्रमुख पदाची जबाबदारी दिली. या जबाबदारीचा पुरेपूर उपयोग करून पक्ष तळागाळापर्यंत नेण्याची ग्वाही संजय देरकर यांनी दिली. कार्यकर्त्यांची सांगड, लोकांचं असणारं प्रेम पाहता येणाऱ्या काळात नक्कीच शिवसेना(उ.बा.ठा) पक्ष वणी विधानसभेमध्ये मोठी कामगिरी बजावेल अशी चर्चा आहे.

asemblyLead StorypoliticsSanjay DerkarShivsenaUddhav ThakreWani Vidhansabha