खडकी फाट्याजवळ दुचाकीची उभ्या ट्रकला धडक, तरुण जखमी

बहुगुणी डेस्क, मारेगाव: खडकी बस स्टॉपजवळ एका दुचाकीने उभ्या ट्रकला धडक दिली. यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. आज बुधवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मंगेश नत्थुजी आत्राम (22) असे जखमीचे नाव आहे. त्याला यवतमाळ येथे उपचासाठी दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

मंगेश हा वणी तालुक्यातील कायर जवळील सैदाबाद येथील रहिवासी आहे. बुधवारी दिनांक 28 फेब्रुवारी रोजी तो त्याच्या दुचाकीने बोटोणी येथे लग्नासाठी आला होता. संध्याकाळी लग्न कार्य आटोपल्यानंतर तो सैदापूर येथे गावी परत जात होता. दरम्यान 7.30 वाजताच्या सुमारास खडकी बस स्टॉपजवळ मंगेशच्या दुचाकीने उभ्या ट्रकला धडकली.

अपघात झाल्याचे लक्षात येताच या मार्गावरून जाणा-या लोकांनी मंगेशला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून मंगेशला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे रेफर केले. घटनेचा तपास मारेगाव करीत आहे. उभा ट्रक दिसला नसल्याने हा अपघात झाल्याचे प्रत्यक्षदर्शीने माहिती दिली. 

हे देखील वाचा: 

संविधान चौकात भीषण अपघात, एक जागीच ठार तर दुसरा जखमी

ऑफरमध्ये बनवा आकर्षक पीव्हीसी (फायबर) फर्निचर

BotoniKhadkiLead Story