शनिवारी वणीत ‘एक शाम राष्ट्र के नाम’ कार्यक्रम

शांती सैनिक विनोद गोन्लावार असणार प्रमुख गायक

जब्बार चीनी, वणी: शनिवारी दिनांक 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 6.30 वाजता वणीतील शेतकरी मंदिर लॉन, वसंत जिनिंग येथे ‘एक शाम राष्ट्र के नाम’ या देशभक्ती गीतांच्या ऑर्केस्ट्राचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम वणीतील द ग्रेट पिपल्स या संघटनेतर्फे आयोजिक करण्यात आला असून हा कार्यक्रम मोफत आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख गायक शांती सैनिक विनोद गोन्लावार (एअर आर्मी डिफेन्स) हे असणार आहे तर विदर्भातील प्रसिद्ध निवेदक चंद्रपूर येथील मकसूद खान हे करणार आहे.

या कार्यक्रमाला वणी आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावाली असे आवाहन दी ग्रेट पिपल्स गृपच्या वतीने करण्यात आले आहे.

हे देखील वाचा:

मानवी जीवन व सृष्टीची वास्तविकता विवेकबुद्धीला प्रेरित करणारी असावी: तौफीक अस्लम

भर रस्त्यात महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवले

Lead StoryOrchestraVinod Gonlawar
Comments (0)
Add Comment