भास्कर राऊत, मारेगाव: शहरातील वार्ड क्रमांक 6 येथे एका 30 वर्षीय विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सोमवारी दि. 27 सप्टेंबर रोजी दुपारी 3.30 वाजताच्या सुमारास ही घटना उघडीस आली. ज्योती रविंद्र पडलवार (30) असे आत्महत्या करणा-या महिलेचे नाव आहे.
मृत ज्योती रवींद्र पडलवार (33) हिचा विवाह काही वर्षांपूर्वी रविंद्र पडलवार यांच्याशी झाला होता. रविंद्र यांचा फळविक्रीचा व्यवसाय होता. त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून पती पत्नीमध्ये पटत नसल्याने ते दोघे वेगळे राहत होते. ज्योती ही वार्ड क्रमांक 6 येथील किर्तीवार यांच्या घरी भाड्याने राहत होती. ती आपल्या दोन चिमुकल्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी मेस चालवायची. अशीही माहिती आहे.
आज दि. 27 सप्टेंबरला दुपारच्या वेळेस दोन्ही मुले घराच्या गच्चीवर पतंग उडवीत होते. पतंग उडविणे झाल्यानंतर मुले खाली आली. घराचा दरवाजा उघडायला गेले तेव्हा तो आतून लाऊन दिसला. आई कोठे गेली म्हणून त्यांनी शेजारी बघितले. मात्र ती कोठेच दिसून आली नाही. त्यामुळे दोन्ही चिमुकल्यांनी मारेगाव येथेच असणाऱ्या त्यांच्या नातेवाईकांना बोलावले.
मोठया आईने येऊन खिडकीतून डोकावून बघीतले असता ज्योतीचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. ते पाहून त्यांना रडू आवरले नाही. ज्योतीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप कळू शकले नाही. त्यांनी लगेच याची माहिती मारेगाव पोलीस ठाण्याला दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले.
मनमिळाऊ स्वभावाच्या ज्योतीने अचानक असे टोकाचे पाऊल उचलल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ज्योतीच्या पश्चात मोठा मुलगा नैतिक वय 10 वर्षे व मुलगी आदिती वय 7 वर्षे अशी दोन मुले आहेत. प्रकरणाचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
हे देखील वाचा: