Breaking News: शेतात वीज कोसळून 2 महिला ठार

कायर परिसरात हळहळ व्यक्त

रवी ढुमणे, वणी: वणी तालुक्यातील कायर येथे शेतात वीज कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाल्याची घटना संध्याकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. कायर येथील हॉटेलचा व्यवसाय करणाऱ्या कुंटावार परिवारातील २५ वर्षीय सून आणि त्यांच्या कडे कामाला असलेली ५० वर्षीय महिला नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेल्या होत्या. दिवसभर काम आटोपून सायंकाळी घरी परतण्याचा वेळीच आकाशात ढग दाटून आले. विजांचा कडकडाट सुरू झाला. सविता पंकज कुंटावार व अनुसया चौधरी या दोघी शेतातून निघणार तितक्यात जोरदार कडकडाटासह वीज त्यांच्या अंगावरच कोसळली.

या घटनेत सविता आणि अनुसया जागीच ठार झाल्या. संध्याकाळी ७ वाजायला आले पण दोघीही घरी परतल्या नाही, त्यामुळे म्हणून घरातील लोक शेताकडे गेले असता दोघीही मृत अवस्थेत आढळल्या. दोघींचे शवं रात्री १० वाजताच्या सुमारास उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले होते. या घटनेने कायर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

KayarLead StoryLightning
Comments (0)
Add Comment