शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा वाढदिवसानिमित्त झाली मॅरेथॉन रॅली

बहुगुणी डेस्क, वणीः शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना व कक्षांनी विविध उपक्रम घेतले. त्याचाच एक भाग म्हणून सकाळी शिवतीर्थावरील शिवस्मारक येथे मॅराथॉन रॅली झाली. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी या रॅलीला झेंडी दाखविली.

पुरुष खुल्या गटातून शुभम बांगडे प्रथम, धीरेंद्र चंदेल दुसरा तर पंकज राठोड तिसरा आला. महिला खुल्या गटातून पल्लवी कवरासे प्रथम,करिष्मा बोंडे दुसरी तर श्रद्धा सिडाम तिसरी आली. 16 वर्षांखालील मुलांतून रोहण भुस्सेवार प्रथम, वेदांत उपरे दुसरा तर मृणाल तुराणकर तिसरा आला. याच गटातील मुलींमधून ग्रिष्मा गवळी प्रथम, मृणाल पिंपळशेंडे दुसरी तर विधी डुकरे तिसरी आली.

या कार्यक्रमाला शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख दीपक कोकास, संजय निखाडे, तालुका प्रमुख गणपत लेडांगे, शहर प्रमुख राजू तुराणकर, युवासेना शहर प्रमुख ललित लांजेवार, तेजराज पिपळशेंडे, ऍड. श्याम निखाडे, राजू देवडे, महेश पहापळे, अजिंक्य शेंडे, बंटी शेंडे, प्रशांत बलकी तसेच शिवसैनिक उपस्थित होते. सूत्रसंचालन अजय नागपूरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता प्रा. दिलीप मालेकर व संतोष बेलेकर यांनी मार्गदर्शन केले.

Lead StoryMarathonRallyShivsenaUddhav Thackrey Birthday
Comments (0)
Add Comment