अल्पवयीन मुलीवर नराधमाचा अत्याचार, मुलगी आठ महिन्यांची गरोदर

वणीत घडली धक्कादायक घटना

वणी: एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीनं मातृत्व लादण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही मुलगी भंगार वेचण्याचं काम करत असून आरोपीनं जबरदस्तीनं तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्तापीत केले होते. सध्या ही मुलगी आठ महिन्यांची गरोदर आहे. मुख्य म्हणजे आरोपीच्या पत्नीनं यासाठी मुलीवर शारीरिक संबंध प्रस्तापीत करण्यासाठी दबाव टाकल्याचं समोर येत आहे. या प्रकरणी मुलीच्या आजीनं तक्रार नोंदवली आहे.

सविस्तर वृत्त असे की मुकूटबन येथील गोडावून जवळ पीडित तरुणी वास्तव्यास आहे. तिचं कुटुंब मोलमजुरी करून संसाराचा गाडा हाकतात. या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती सध्या ह्यात नाही. 13 वर्षीय मुलीचे आईवडील मरण पावल्यानं ती सध्या तिच्या मोठ्या बहीणीकडे वणीला आली होती. मोठी बहीण शहरातील सार्वजनिक दुरभाष केंद्र कार्यालयाजवळ राहते. तिथेच रंगा शंकर चिंतलवार व शारदा रंगा चिंतलवार हे जोडपे राहतात. हे सर्व भंगार वस्तू गोळा करण्याचं काम करतात.

एक दिवस पीडितेवर रंगाचा डोळा गेला. त्यानं या सोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. बालिकेनं त्याला नकार देताच शारदानं तिला मारहाण करून बळजबरीने नवरा जसं करेल तसं करत जा, असं धमकावलं. त्यानंतर नेहमी धमकावून पीडितेचं या नराधमानं तिचं शोषण केलं. अशी तक्रार आजीनं केलीये.

परिणामी पीडिता गरोदर राहीली. गरोदर झाल्यानंतर शारदा रंगा चिंतलवार हीने रंगाला विरोध केला, पण वासनेत पागल झालेल्या रंगानं तिलाही जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडिता मुकाट्याने हा अत्याचार सहन करत होती.

(पसार झालेला चोरटा वणी पोलिसांच्या जाळ्यात)

दरम्यान पीडितेची आजी वणीला आली. तिला तिच्या नातीचं पोट मोठं दिसलं. तिनं याबाबत तिला विचारणा केल्यावर तिनं तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार सांगितला. सध्या ती आठ महिण्यांची गरोदर आहे. हा सर्व प्रकार रंगा शंकर चिंतलवार आणि शारदा रंगा चिंतलवार यांनी संगणमताने व बळजबरीने केला असल्याचं नातीनं आजीला सांगताच आजीनं पोलीस ठाणे गाठून या घटनेची तक्रार पोलीसात नोंदविली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

 

Lead StoryMinor girlRapeWani police
Comments (0)
Add Comment