मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रात राजर्षी शाहू महाराज जयंती

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथे राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचीत्य साधून मुकुटबन प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना फळे वाटून राजश्री शाहू महाराजांची जयंती वनविभाग व मराठा सेवा संघाच्या संयुक्त विद्यमाने साजरी करण्यात आली.

राजर्षी शाहू महाराजाच्या प्रतिमेला हारार्पण करून त्यांच्या समाजातील कार्याबद्दल माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे व कपिल शृंगारे यांनी दिली.  यावेळी वृक्षारोपणचा संदेश दिला.

मुकुटबन वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय वारे, प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. अभिजित चारथळ, मराठा सेवा संघाचे कपिल शृंगारे, शुभम राऊत, देव येवले, केतन ठाकरे  आदी पदाधिकारी, वनविभाग व आरोग्य केंद्रातील कर्मचारी उपस्थित होते.

JayantiLead StoryMaharajMukutbanPHCShahuWaniZari
Comments (0)
Add Comment