गुरुवारी “रघुवंशम”वर संस्कृत साहित्य रसास्वाद अंतर्गत व्याख्यान

सुनील इंदुवामन ठाकरे, वणी: संस्कृत भारती , लोकमान्य टिळक महाविद्यालयातील संस्कृत विभाग,जैताई देवस्थान तथा नगर वाचनालय वणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिमासात आयोजित संस्कृत साहित्य रसास्वाद व्याख्यानमाला होते. या महिन्यातील व्याख्यान  गुरुवार २८  जून रोजी सायंकाळी ठीक सात वाजता नगरवाचनालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आले आहे.

गत तीन महिन्यांपासून महाकवी कालिदास विरचित रघुवंशम् चा रसास्वाद या व्याख्यानमालेत घडत आहे.  यातील विविध प्रसंगांचा परिचय प्रा. डॉ. स्वानंद गजानन पुंड करून देतील.

वणीकर संस्कृत प्रेमीजनांनी अधिकाधिक संख्येने या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

JaitaikalidasLead Storyraghuvanshamsanskritswanand pundWani
Comments (0)
Add Comment