पुरुषोत्तम नवघरे, वणी: दिनांक 17 डिसेंबर रोजी नागपूर येथे ओकोनिवा शोरीन रिया शोरिकीन ज्यूडो कराटे असोसिएशन अँड एज्युकेशन सोसायटी महाराष्ट्राच्या वतीने बेल्ट टेस्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या बेल्ट टेस्ट स्पर्धेमध्ये वणी येथील कु. लेखा कुमरे हिला ब्लॅक बेल्ट फर्स्ट डाऊन अवार्डने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सचिव संगीता तलमले यांच्या हस्ते तिला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रशिक्षक शरद सुखदेव यांच्या मार्गदर्शनात शरद चिकाटे, धनंजय त्र्यंबके यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा पार पडली. प्रशिक्षक शरद चिकाटे यांच्या मार्गदर्शनात लेखा कराटेचे धडे घेत आहे. लेखाच्या कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. लेखा आपल्या यशाचे श्रेय आई-वडील गुरुजन यांना देते.