तलावात उडी घेऊन इसमाची आत्महत्या

मारेगाव तालुक्यातील जळका येथील घटना

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील जळका येथील एका व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 26 नोव्हेंबर रोज गुरुवारला सकाळी 10 वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. विठ्ठल पोतू टेकाम (48) असे आत्महत्या करणाऱ्या इसमाचे नाव आहे.

सतत होणाऱ्या आत्महत्येने तालुका हादरला असतानाच अशातच जळका येथील विठ्ठल पोतू टेकाम या व्यक्तीने तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही.

या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक विठ्ठल यांच्यापश्चात पत्नी, दोन मुले व एक मुलगी असा परिवार आहे.  तालुक्यात नियमित होणाऱ्या आत्महत्या हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

हेदेखील वाचा

आठ शतकांपासूनच संत नामदेव महाराज ‘ग्लोबल’च आहेत

हेदेखील वाचा

वणीत माकप आणि किसानसभेचे रास्ता रोको आंदोलन

 

 

 

JalkaLead StoryMaregaonSuicideThursday
Comments (0)
Add Comment