कोरोनाने घेतला मारेगाव तालुक्यात दुसरा बळी

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यातील कोथुर्ला येथील एका 65 वर्षीय पुरुषाचा कोरोनामूळे मृत्यू झाला. कोरोनाने घेतलेला हा तालुक्यातील दुसरा बळी आहे. आज 26 सप्टेंबर रोजी चिंचमंडळ येथील 50 वर्षीय पुरुष रॅपीड टेस्ट द्वारे पॉझिटिव्ह आला आहे.

कोरोनामुळे कोथुर्ला येथील 65 वर्षीय इसमाला सावंगी मेघे वर्धा येथे गेल्या दहा दिवसांपूर्वी सामान्य उपचारासाठी दाखल केले होते. मात्र सध्या रुग्ण दाखल कऱण्याआधी कोविड टेस्ट घेतली जात. त्यात ती व्यक्ती पॉझिटिव्ह आली. त्यामुळे त्यांना 16 तारखेला तेथील आयसोलेशन वार्डात भरती करण्यात आले.

सतत दहा दिवस त्यांच्यावर उपचार सुरू असताना आज सकाळी साडेपाच वाजताच्या दरम्यान त्याचा मृत्यू झाला. तालुक्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये चिंताजनक वाढ होत असून मारेगाव येथील कृषी केंद्र संचालकाचा यवतमाळ येथे उपचार दरम्यान 15 सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. त्यानंतर कोरोनाचा हा तालुक्यातील हा दुसरा बळी आहे.

आज चिंचमंडळ येथील एका 50 वर्षीय पुरुषाची रॅपीड टेस्ट केली असता तो पॉझिटिव्ह आला आहे. तालुक्यातील 19 रुग्णाचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने ते बरे झाले आहे. आता कोव्हीड सेंटरवर 7 रुग्ण उपचार घेत आहे.

(वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील बातम्या आणि घडामोडीसाठी वणी बहुगुणीचे फेसबुक पेज लाईक करा…)

CoroanCOronaLead StoryMaregaon
Comments (0)
Add Comment