बस स्थानकावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला

ओळख पटविण्याचे पोलिसांनी केले आवाहन

जितेंद्र कोठारी, वणी : येथील एस.टी. बस स्थानकावर मंगळवारी सकाळी एका अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. प्रवासी बसण्याच्या फलाटावर एक इसम मृत असल्याची सूचना बस स्थानक अधिकाऱ्यांनी सकाळी 7.30 वाजता दरम्यान वणी पोलीस स्टेशनला दिली. सूचनेवरून पीएसआय प्रवीण हिरे यांनी बस स्थानकावर जाऊन मृतदेहाचा पंचनामा केला. मृतकाच्या अंगावर काळा रंगाचा चेक्सचा शर्ट व अंदाजे 38 वर्ष वय आहे. मृतकाची ओळख पटली नसून प्रेत ग्रामीण रुग्णालयच्या मोर्चरीमध्ये ठेवण्यात आले आहे. वरील वर्णनाचा मृतक कोणाचा ओळखीचा असेल तर त्यांनी वणी पोलीस ठाण्यात माहिती द्यावी. असे आवाहन पोलिसांनी केले आहे

Lead StoryS.T. stationunknown deadbody