एकाच दिवसात मोबाईल चोरटा पोलिसांच्या जाळ्यात

खिडकीतून मोबाईल केला होता लंपास

विवेक तोटेवार, वणी: गुरुवारी 18 जून रोजी शास्त्रीनगर भागातून एका चोरट्याने खिडकीतून हात टाकून मोबाईल व 3000 रुपये नगदी चोरले होते. याबाबतची तक्रार 25 जून रोजी फिर्यादीने वणी पोलीस ठाण्यात दिला. पोलिसांनी 25 जूनला म्हणजे फिर्याद मिळालेल्या दिवशीच आरोपीला अटक केली आहे.

शहरातील शास्त्रीनगर भागत राहणाऱ्या राहुल दिलीप गटलेवार (32) यांच्या घरातून खिडकीत ठेऊन असलेला ओप्पो कंपनीचा मोबाईल व 3000 हजार रुपये नगदी असा 12 हजार रुपयांचा मुद्देमाल 18 जून रोजी चोरी गेला. याबाबतची तक्रार राहुल यांनी गुरुवारी 25 जून रोजी वणी पोलोस ठाण्यात दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 भादवी नुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी आरोपी राजू पुरुषोत्तम पोटे (35) रा. नवीन लालगुडा याला अटक केली. त्याच्याकडून चोरी गेलेला मोबाईल व 1600 रुपये नगदी जप्त करण्यात आले.

सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक व ठाणेदार वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात डीबी पथकाचे सुदर्शन वनोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, अमित पोयाम, दीपक वांड्रसवार, विठ्ठल बुरेवार, पंकज उंबरकर यांनी केली.

Crime
Comments (0)
Add Comment