गिरीष कुबडे, वणी: वणी येथील जैन ले आऊट परिसरातील शिव अपारमेन्ट मधील अक्षय जाचक (24) या तरुणाचा मंगळवारी दुपारी 1 च्या सुमारास हृदयविकाराच्याा तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दुपारी अक्षय ने जेवण केल्या नंतर त्याच्या छातीत दुखू लागल्याचे त्याने आईला सांगितले. तेवढ्यात तो खाली कोसळला. त्याला तात्काळ सुगम हॉस्पिटल मध्ये नेण्यात आले. परंतु अक्षयचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अक्षय परिसरात मनमिळावू म्हणून ओळखला जायचा. एवढ्या कमी वयात हृदयाच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.