भास्कर राऊत, मारेगाव: जीवनाला कंटाळलेल्या एका युवकाने विषारी कीटकनाशक घेऊन स्वतःचे जीवन संपवल्याची घटना तालुक्यातील पहापळ येथे घडली. विशाल शंकर इंगोले वय 30 वर्षे असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.
विशाल हा रोजमजुरी करून आपला उदरनिर्वाह करायचा. विशालचे लग्न गावातीलच एका मुलीशी सुमारे 9 ते 10 वर्षांपूर्वी झाले होते. परंतु संसार फुलण्याआधीच काही काळातच विशाल आणि पत्नीचा घटस्फोट झाला. त्यांना 8 वर्षाची एक मुलगी असल्याचेही कळते. ती विशाल कडेच आहेत. त्यामुळे मागील काही दिवसांपासून विशाल हा नैराश्यामध्ये जीवन जगत होता असे गावातील काही मंडळी सांगत आहेत.
अशातच विशाल हा दि.25 एप्रिलला शेतामध्ये जाऊन विषारी कीटकनाशक प्राशन केले. तो घराकडे परत येत असतांना गावाजवळील देशपांडे यांच्या शेतामध्ये कोसळला. गावामध्ये लग्न असल्याने वरातीच्या गाड्या त्या शेतजवळ उभ्या होत्या. त्या गाडीवाल्यांना तो कोसळताना दिसताच ते धावत त्याच्याकडे गेले. त्यावेळी गावातील काही नागरिकसूद्धा होते.
विशालच्या तोंडाला फेस येऊन दिसल्याने त्याला तात्काळ ऑटो करून मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. परंतु उपचाराआधीच विशालची प्राणज्योत मालवली होती. विशालच्या मागे आईबाबा, लहान भाऊ व एक मुलगी असा आप्तपरिवार आहेत.
हे देखील वाचा: