वणीची चिमुकली मायशा खान चमकली मिस ज्यु. मिस इंडियामध्ये

मायशाला सर्वोत्कृष्ट केशरचना (प्रेटिएस्ट हेअर) अवॉर्ड

पुरुषोत्तम नवघरे, वणी: मुंबई येथे झालेल्या ज्युनियर मिस इंडियाच्या (4-6 वयोगट) टॉप 5 मध्ये वणीची चिमुकली मायशा फैजल खान ही पोहोचली. या स्पर्धेत 120 चिमुकल्यांनी सहभाग घेतला होता. यात मायशा ही सर्वात लहान (वय 3.5) वयाची स्पर्धक होती. स्पर्धेत झालेल्या सांस्कृतिक राउंडमध्ये मायशाला सर्वोत्कृष्ट केशरचना (प्रेटिएस्ट हेअर) हा अवॉर्ड मिळाला. मायशा ही ड्रीम्झ प्ले स्कूल नर्सरीची विद्यार्थीनी असून राजूर येथील व्यावसायिक फैजल खान यांची कन्या आहे. मायशाच्या यशाचे कौतुक केले जात आहे.

Lead Storymaysha khanmiss india junior