वणी उपविभागात प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित

सुरेन्द्र इखारे वणी: येथील उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधीकारी कार्यालयातून प्रथमच मराठा जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले. महाराष्ट्र शासन निर्णयानुसार मराठा समाजाला आरक्षण जाहीर झाले.

त्या नंतर वणी उपविभागीय अधिकारी प्रकाश एम राऊत यांनी वणी येथील स्नेहा सुरेशराव कोराटे या युवतीला मराठा जातीचे वितरित करण्यात आले. वणी विभागात प्रथमच हे मराठा जातीचे प्रमाणपत्र असल्याने प्रमाणपत्र वितरित करताना उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत, तहसीलदार श्याम एम धनमने, नायब तहसीलदार ए सी ब्राह्मणवाडे ,जितेंद्र पाटील, नितीन वैद्य तसेच महसूल अधिकारी उपस्थित होते.

Maratha Caste CertificateWani Sub Division office
Comments (0)
Add Comment