जितेंद्र कोठारी, वणी : येथील सतीधाम घाटावरील मोक्षधाम आवारात मागील काही दिवसांपासून बेवारस बकऱ्यांनी हैदोस घातला आहे. अंत्यविधी व त्यापूर्वीचे सोपस्कार करताना या बेवारस बकऱ्या अडथळा निर्माण करत आहे. मोक्षधाममध्ये मयत येताच अचानक 10-12 बकऱ्या मृतदेहाला गराडा घालून मयतीवरचे हार फुल खाऊन टाकते. तर इतर सोपस्कार आटोपतानासुद्धा बेवारस बकऱ्या अडथळा निर्माण करीत असल्याची नागरिकांची तक्रार आहे. बकऱ्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या काही नागरिकांची असून अनेकदा सांगूनही ते लोकं बकऱ्या मोकाट सोडत आहे. नगरपरिषद अधिकाऱ्यांनी या समस्येकडे लक्ष देऊन बेवारस बकऱ्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.