अध्यक्ष रवी बेलूरकर तर सचिव तुषार अतकारे

प्रेस वेलफेअर असोसिएशनची निवड

विवेक तोटेवार, वणी: प्रेस वेलफेअर असोसिएशन ही पत्रकारांच्या न्याय्य हक्कांकरिता अग्रेसर असलेली पत्रकारांची संघटना आहे. संघटनेचे मावळते अध्यक्ष गजानन कासावार यांनी निवडणूक जाहीर केली. सर्वानुमते अध्यक्षपदावर तरुण भारतचे वार्ताहर रवी बेलूरकर व सकाळ वृत्तपत्राचे तालुका प्रतिनिधी तुषार अतकारे यांची निवड करण्यात आली.

सोबतच उपाध्यक्षपदी डाँ.चवणे, सहसचिवपदी जितेंद्र डाबरे, कोषाध्यक्षपदी जावेद पठाण यांची निवड झाली आहे. पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रांत यांचे खूप मोठे योगदान आहे. त्यांच्या या निवडीमुळे सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे. चहूकडून त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होत आहे.

electedLead StorynewPressWelfare
Comments (0)
Add Comment