नांदेपेरा येथे विजेच्या धक्क्याने तरुणाचा मृत्यू

परिसरात हळहळ व्यक्त

विवेक तोटेवार, वणी: रविवारी दिनांक 24 मे रात्री 10 वाजताच्या दरम्यान नांदेपेरा येथील तरुणाचा विजेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घरातील इलेक्टिकचे काम करीत असताना ही दुर्दैवी घटना घडली.

चंद्रशेखर प्रभाकर जोंजाळकर (22) हा तरुण 24 मे ला रात्री 10.30 वाजता आपल्या राहत्या घरी लाईनचे काम करीत होता. त्यावेळी टिनाच्या पत्र्यामध्ये करंट होता. त्या पत्र्याच्या संपर्कात येताच त्याला विजेचा जोरदार धक्का बसला. कुटुंबियांनी त्याला त्वरित वणीच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

शवविच्छेदन करून 25 मे ला 11 वाजता त्याचे पार्थिव त्याच्या कुटुंबियांच्या स्वाधीन करण्यात आले. चंद्रशेखरच्या मृत्यूने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

electric shockLead StoryNandepera
Comments (0)
Add Comment