लोडशेडिंगच्या निषेधार्थ वणी भाजपचा आज कंदील मोर्चा

महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात भाजप मैदानात

जितेंद्र कोठारी, वणी : राज्यात लागू करण्यात आलेली अघोषित लोडशेडिंगच्या विरोधात वणी तालुका व शहर भाजपतर्फे आज सोमवार 25 एप्रिल रोजी कंदील मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या नेतृत्वात शासकीय विश्रामगृह ते टिळक चौक पर्यंत सायंकाळी 6 वाजता भाजप कार्यकर्ते कंदील पेटवून राज्य शासनाचा निषेध करणार आहे.

विजेचे वाढलेले बिल, ग्रामीण भागात अघोषित लोडशेडिंग आणि शेतकऱ्यांचे वीज कनेक्शन कापण्याच्या विरोधात भारतीय जनता पक्ष संपूर्ण राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात आंदोलन करीत आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण राज्यात लोडशेडिंगची परिस्थिती उद्भवली आहे. अवाच्या सव्वा वीज बिलामुळे राज्यातील जनता आधीच हैराण आहे. त्यावर एप्रिल महिन्यात वीज ग्राहकांना हजारो रुपयांचे अतिरिक्त सुरक्षा ठेव बिल पाठविण्यात आले आहे.

कंदील मोर्चात आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, रवी बेलूरकर, तारेंद्र बोर्डे, विजय पिदूरकर, दिनकर पावडेसह भाजप व्यापारी आघाडी व शेकडो भाजप कार्यकर्ता सहभागी होणार आहे.

Lead Story