ऍड नितीन तिर्थगिरीकर यांचे अल्पशा आजाराने निधन

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील मुकुटबन येथील रहिवासी व तालुक्यातील सुपरिचित वकील नितीन चक्रधर तिर्थगिरीकर यांचे निधन झाले. ते 40 वर्षांचे होते. नागपूर येथील लता मंगेशकर हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर 15 दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र गेल्या दोन दिवसांपासून त्यांची प्रकृर्ती खालावली व २४ मार्चला सकाळी १२ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.

नितीन हे झरी न्यायालयात कार्य करत होते. मनमिळाऊ स्वभाव, गोरगरीब आदिवासी जनतेसाठी मोफत सल्ला देणे, तसेत अडिअडचणीच्या वेळी धावून जाणारे व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख होती. काल संध्याकाऴी त्यांचा अंत्यविधी पार पडला. त्यावेळेस गावकरी  तालुक्यातील राजकीय मंडळी विविध विभागाचे, अधिकारी, कर्मचारी वकील संघ व मित्र मंडळी मोठ्या संख्येने होते. त्यांच्या मागे आई वडील लहान भाऊ व भाऊसून असा परिवार होता

Nidhan warta
Comments (0)
Add Comment