अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविनारा तरुण गजाआड

सुशील ओझा, झरी: मुकुटबन पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या येडसी येथील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याची घटना घडली. माहितीनुसार मुलगी १० व्या वर्गात शिकत होती. २२ मार्च ला अखेरचा पेपर देऊन घरी परत न आल्याने मुलीच्या वडीलाने २३ मार्चला पोलीस स्टेशनला तक्रार नोंदविली त्यावरून पोलिसांनी कलम ३६३ क प्रमाणे नोंद केली. परंतु ३ दिवस लोटूनही मुलीचा पत्ता न लागल्याने पोलीसानी तपासचक्र फिरविले व गुप्तचर विभागाचे पोलीस कर्मचारी नीरज पातूरकर यांनी मुलीची माहिती काढली.

त्यात आरोपी मुलगा हा मुलीला घेऊन बहिणीच्या घरी  गेल्याची माहिती मिळाली. त्यांना वरिष्ठ अधिकारी यांना कळविले. यावरून ठाणेदार धर्मा सोनुने यांनी २५ मार्च रोज  ए. एस. आय. पुरुषोत्तम घोडाम, जमादार मारोती टोंगे,रमेश ताजने व मुलीच्या काही नातेवाईकांना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील  टेकामांडवा येथे जाऊन आरोपी धम्मदीप साहेबराव सोनकांबळे रा. पार्डी जिल्हा चंद्रपूर याला त्याच्या बहिणीच्या घरी जाऊन अटक करण्यात आली.

आरोपी विरुद्ध बलात्कारासह बाललैंगिक अत्याचार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आले तर मुलीला वैद्यकीय तपासणी करीता पाठविण्यात आले. पुढील तपास ठाणेदार धर्मा सोनुने व सुलभ उईके करीत आहे.

Minor girl
Comments (0)
Add Comment