मारेगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघ कार्यकारणी गठित

मारेगाव: नुकतीच ग्रामीण पत्रकार संघाच्या बैठकीत स्थानिक विश्रामगृह येथे ग्रामीण पत्रकार संघाची नवीन कार्यकारणी गठित करन्यात आली. त्यात सर्वाणुमते अध्यक्ष म्हणून डाॅ.प्रा.माणिक ठिकरे यांची निवड करन्यात आली तर सचिवपदी लोकशाहीवार्ताचे ता. प्र माणिक कांबळे यांची निवड करन्यात आली.

लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ असलेला पत्रकार हा समाजात होनार्या अन्याय अत्याचारावर वाचा फोडताना कधी पत्रकारावरच हल्ल्याचे प्रयत्न केल्या जातात. त्यामुळे पत्रकार हा संघटित व्हावा यासाठी मारेगाव तालुका ग्रामीण पत्रकार संघाची कार्यकारणी गठित करण्यात आली आहे.

कार्यकारिणीत कार्याध्यक्ष म्हणून ज्योतिबा पोटे, उपाध्यक्ष म्हणून भास्कराव धानफुले कोषाध्यक्ष नागेश रायपुरे, सहसचिव सिडाम, सदस्य अशोक कोरडे, रमेश झिंगरे, सुरेश नाखले, उमर शरिफ, बंडु उज्वलकर, अनंत भोयर, भास्कर राऊत हे आहेत. कार्यकारणी निवडीचे काम यवतमाळ जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाचे उपाध्यक्ष प्रमोद गवारकर यांच्या मार्गदर्शनाखाली करन्यात अाले.

Lead StoryMaregaonpatrakar sangh
Comments (0)
Add Comment