ज्योतिबा पोटे, मारेगाव: कुंभा येथुन येणा-या नरसाळा गीट्टी खदानला जाणारा टिप्पर रस्त्याच्या कडेला उलटला. या अपघातात एक ठार तर दोन जखमी झाले आहेत.
कुंभा येथे गीट्टी मटेरीयल टाकुण नरसाळा कडे परत जात असतांना लोकेश लाईम कंपनीचे टिप्पर क्रमांक एम.एच २९ टी १२६८ वाहनात अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने वाहन चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे टिप्पर रस्त्याच्या कडेला घुसले.
या अपघातात दीपक रामदास सुरतेकर (२६) रा.नरसाळा हा टिप्पर खाली दबुन जागीच ठार झाला तर टिप्परवरील मजुर महेश रघुनाथ कोवे (१९) ,व नामदेव तोडासे (२०) दोघेही राहणार नरसाळा जखमी झाले आहे.