विवेक तोटेवार, वणी: त्याने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवले. मुलीवर सातत्याने अत्याचार केला. मात्र जेव्हा मुलगी गर्भवती झाली. त्याने जबरदस्ती तिचा गर्भपात करवून घेतला आणि लग्नास नकारही दिला. अखेर मुलीने तरुणाविरोधात वणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी आरोपील अटक करण्यात आली आहे.
शहरातील रंगारीपुरा येथे आरोपी पंकज गंगाधर लाकडे (26) हा तरुण राहतो. त्याची पीडित अल्पवयीन मुलीशी ओळख होती. दोन तीन वर्षाआधी त्यांच्याच प्रेमसंबंध निर्माण झाले. आरोपीने तिला लग्नाचे आमिष दाखवले. आरोपी अल्पवयीन मुलीला वडगाव मार्गावरील निर्जन स्थळी नेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक संबंध ठेवले. दोन ते अडीज वर्षांपासून तो मुलीचे शारीरिक शोषण करीत होता. असे तक्रारी म्हटले आहे.
दरम्यान मुली गर्भवती झाली. त्याने तिला गर्भपात करण्यास भाग पाडले. त्यानंतरही त्याने त्या अल्पवयीन मुलीचे शारीरिक शोषण सुरूच ठेवले. दरम्यान मुलीने आरोपीला लग्नाची गळ घातली. मात्र आरोपीने याला नकार दिला. मुलीने याबाबत विचारणा केली असता आरोपी लग्नाबाबत टाळाटाळ करायचा. अखेर आरोपीने फसवणूक केल्याचे कळताच मुलीने पोलीस स्टेशन गाठले व तरुणाविरुद्ध पोलीस स्टेशनला तक्रार दिली.
पोलिसांनी मुलीच्या तक्रारीवरून आरोपी पंकज लाकडे याला तत्काळ अटक केली. आरोपीवर भादंविच्या कलम 376 (2), 346 (3) (J) (N) व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार श्याम सोनटक्के यांच्या मार्गदर्शनात एपीआय माया चाटसे करित आहे.
हे देखील वाचा: