वि. मा. ताजने, वणी: वणी तालुक्यातील कुर्ली बंदीत वाघाने पाळीव जनावरांवर हल्ला चढवला. यात दोन वर्षाचा गोरा आणि विलायती जातीचा कुत्रा ठार झाला. ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. कुर्ली बंदीत परिसरातील गुराखी जनावरे चराईसाठी नेतात.
शनिवारी शेवाळा येथील गुराखी मारोती आत्राम हे गुरे चारत होते. अचानक गर्द झाडीतुन वाघाने ज्ञानेश्वर तुमराम यांच्या मालकीच्या कुत्र्यावर हल्ला चढवला. यात कुत्रा ठार झाला. यावेळी जनावरे घाबरून सैरावैरा पळू लागले. थोड्याच वेळात पुन्हा जनावरांवर हल्ला चढवला. यात ऋषी तुमराम यांच्या मालकीचा दोन वर्षे वयाचा गोरा ठार झाला. यात तुमराम यांचे अंदाजे वीस हजारांचे नुकसान झाले. सदर घटनेमुळे गुराखी आणि शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण पसरले आहे.