भारतीय स्वयंसेवी महासंघ संस्थेची कार्यकारणी गठीत

झरी शाखेत नव्या पदाधिकाऱ्यांचा समावेश

सुशील ओझा, झरी: भारतीय स्वयंसेवी संस्था महासंघ भारत संस्थेची कार्यकारणी गठीत करण्यात आली.
कार्यक्रमात स्वयंसेवी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर संजय कांबळे, प्रशासनप्रमुख तथा जिल्हा संघटक डॉ. विष्णू उकंडे, राज्य समन्वयक करमा तेलंग, प्रशासन समिती कार्याध्यक्ष जुनेद अली काझी, प्रशासन समिती सदस्य नासिर नियाजी, सदस्य गौरव इंगळे, प्रशासन समिती समन्वय इरफान शेख , नितेश राठोड तालुका अध्यक्ष, वणी तालुका अध्यक्ष स्नेहल पाटील, राजू लक्षतीवार, पांडुरंग सोयाम, संदीप आसुटकर, मंजूषा नामदेव किनाके, शरादा गोसीखुलवार, आसिफ कुरेशी उपस्थित होते.

झरी येथे तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली. प्रशासन प्रमुख डॉक्टर विष्णू उकंडे यांनी महासंघाचे कार्य व उद्दिष्ट यांची माहिती दिली. डॉ. विष्णू उकंडे व प्रशासन पदाधिकारी यांच्या हस्ते नितेश राठोड यांची तालुका अध्यक्ष ,राजू लक्षट्टीवार यांची ग्रामीण उपाध्यक्ष, पांडुरंग पाेयाम यांची उपाध्यक्ष, संदीप आसुटकर यांची तालुका संघटक, मंजूषा नामदेव किनाके यांची झरी शहर अध्यक्ष, सारदा गोसीखुलवार यांची शहर उपाध्यक्ष, आसिफ कुरेशी यांची शहर अध्यक्ष नियुक्ती करण्यात आली. झरीतीली मदन गेडाम व नामदेव किनाके यावेळी उपस्थित हाेते.

Lead StorymahasanghSanstaSwamsevi
Comments (0)
Add Comment