प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरला सॅनिटीझर मशीन भेट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बसपातर्फे भेट

विवेक तोटेवार, वणी: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन सध्या सर्वोत्तपरी कार्यरत आहे. यात आपले सुद्धा काही योगदान म्हणून बहुजन समाज पार्टी तर्फे प्राथमिक आरोग्य केंद्र राजूरला सॅनिटायझर मशीन भेट देण्यात आली. सोमवारी 20 जुलै रोजी राजूरमध्ये एक रुग्ण आढळल्याच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून ही भेट देण्यात आली आहे.

यावेळी बसपा नेते विजय वानखेडे, माजी पं. स. सदस्य अशोक वानखेडे, वणी विधानसभा अध्यक्ष प्रवीण खानझोडे, माजी पं. स. उपसभापती वृषालीताई खानझोडे, ग. विकास अधिकारी गायनार, वैद्यकीय अधिकारी डॉ. चिखलीकर, पोलीस पाटील सरोज मून, राधेश्याम सूर्यवंशी, भीमराव जंगले, सोमेश्वर जांगडे, सुलोचना वानखेडे, विकेश जंगले, पंकज कांबळे, महेश लिपटे उपस्थित होते.

Lead StoryPravin KhanzodeRajur
Comments (0)
Add Comment