जुन्या वादातून तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार

इंदिरा चौकातील घटना, तरुण गंभीर जखमी

विवेक तोटेवार, वणी: इंदिरा चौकात एका तरुणाच्या डोक्यावर फरशीने प्रहार करण्यात आला. शुक्रवार 23 जुलै रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. यात तरुण गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी भुऱ्या उर्फ मंगेश कुडमेथे (21) रा. इंदिरा चौक याच्यासह त्याच्या मित्रावर गुन् दाखल करण्यात आला आहे

सविस्तर वृत्त असे की शुक्रवारी 23 जुलै रोजी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास फिर्यादी हर्षल पांडुरंग वैद्य (24) रा. जैन के आऊट वणी हा आपल्या दुचाकीने ब्राह्मणी रोडवरून येत होते. रस्त्यात उभ्या असलेल्या भुऱ्या उर्फ मंगेश कुडमेथे (21) रा. इंदिरा चौक याने हर्षेलला अडविले व त्याच्या सोबत जुन्या कारणावरून वाद घातला. यावेळी मंगेश सोबत त्याचा मित्र शुभम हा देखील होता.

शिवीगाळ करीत भु-या उर्फ मंगेशने हर्षलच्या डोक्यावर फरशीने प्रहार केला. यामध्ये हर्षलचे डोके फुटले व रक्तस्राव होऊ लागला. हर्षलने या घटनेबाबत वणी पोलिसात तक्रार दिली. त्याच्या तक्रारीवरून वणी पोलिसात आरोपी मंगेश व शुभम याच्याविरुद्ध कलम 324, 504, 506, 34 भादवी नुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास सोमेश्वर कुमरे करीत आहे.

हे देखील वाचा:

विदर्भा नदीला पूर… नदीकाठच्या काही गावांचा संपर्क तुटला

FightIndira chawkLead Story
Comments (0)
Add Comment