मारेगाव तालुक्यात पुन्हा 25 पॉझिटिव्ह

217 लोकांनी केल्यात कोरोना टेस्ट

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्यात कोरोना व्हायरसचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार 23 एप्रिल रोजी पुन्हा 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे. यात शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 16 रुग्णांचा समावेश आहे.

येथील कोविड सेंटरवर रॅपिड टेस्टद्वारे 79 तर आरटीपीसीआरद्वारे 138 असे एकूण 217 व्यक्तींनी कोरोनाची तपासणी केली आहे. या तपासणीमध्ये मारेगाव शहरातील 9 तर ग्रामीण भागातील 16 असे एकूण 25 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहे.

शहर सोडून तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव जास्त वाढत असल्याने गाव खेड्यात काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

हेदेखील वाचा

हंसराज अहीर यांची ट्रामा केअर सेंटरला भेट

हेदेखील वाचा

कुंभा येथे कोरोना लसीकरण केंद्र तात्काळ सुरू करा

हेदेखील वाचा

लॉकडाऊनमध्ये मयूर मार्केटिंगतर्फे ऑनलाईन सेवा सुरू

Lead StoryMaregaon Coronatwenty five
Comments (0)
Add Comment