वणीत विविध उपक्रमाद्वारे संत गाडगेबाबा जयंती साजरी

काँग्रेसतर्फे गाडगेबाबांना अभिवादन

विवेक तोटेवार, वणी: संत गाडगेबाबा यांची जयंती वणी व परिसरात उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्त संत गाडगेबाबा स्मारक येथे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले. स्वच्छता अभियान, फळवाटप, प्रबोधनपर कार्यक्रम, कीर्तन इत्यादींचे आयोजन करण्यात आले. तर काँग्रेस पक्षातर्फे इजहार शेख यांच्या प्रमुख उपस्थितीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला हारार्पन करून अभिवादन करण्यात आले.

सकाळी 6 वाजता निळापूर येथील गाडगेबाबा स्मारक येथे स्वच्छता अभियान राबवण्यात आले. सकाळी 10 वाजता ग्रामीण रुग्णालय वणी येथे फळवाटप करण्यात आले. याचे आयोजन श्री रंगनाथ स्वामी पतसंस्थेद्वारा करण्यात आले. दुपारी 12 वाजता रविदास मानव, आकाशदादा तविडे व बालकीर्तनकार प्रज्वल टोंगे यांचे कीर्तन झाले. दुपारी 3 वाजता स्नेहभोजन व बक्षीस वाटपाचा कार्यक्रम झाला.

काँग्रेसतर्फे संत गाडगेबाबांना अभिवादन
वणीतील संत गाडगेबाबा चौक येथे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे अभिवादन करण्यात आले. काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ईजहार शेख यांच्या मार्गदर्शनात हा अभिवादन कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी उपस्थितांनी संत गाडगेबाब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. संतोष पारखी, संदीप मुत्यलवार, अभिजीत सोनटक्के, मनीष बोबडे, सैफुर् रहेमान, साहिल झाडे, चेतन राऊत, मोफिज् शेख, रवी गुप्ता इत्यादींची या कार्यक्रमाला उपस्थिती होती.

गाडगेबाबा स्मारक येथील विविध उपक्रमाचे आयोजन धोबी समाज सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक बहुउद्देशिय संस्था, ड्रायक्लिनर्स असोसिएशन, न्यू डेबुजी फोर्स, महिला समिती इत्यादी द्वारा करण्यात आले. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाजबांधव व नागरिक उपस्थित होते.

हे देखील वाचा:

एक दिवशीय जम्बो ऑफर, साउंडबार अवघ्या 2999 रु. मध्ये

युक्रेन-रशिया युद्धामुळे शेअर मार्केटमध्ये ऐतिहासिक घसरण

Lead StorySant Gadgebaba Jayanti