शिंदोला येथे संत गाडगेबाबा जयंती साजरी

संत गाडगेबाबा वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक: बापूजी साळवे

तालुका प्रतिनिधी, वणी: तालुक्यातील शिंदोला येथील गुरुदेव सेवा मंडळाच्या वतीने मंगळवारी गाडगेबाबा जयंती साजरी करण्यात आली. मंडळाचे अध्यक्ष बापूजी साळवे यांच्या हस्ते गाडगेबाबांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थितांनी मनोगत व्यक्त केले.

‘संत गाडगेबाबा हे वैज्ञानिक दृष्टिकोन असलेले समाजसुधारक होते. त्यांचं कीर्तन म्हणजे लोक प्रबोधनाचा एक भाग असे’. असे विचार अध्यक्ष साळवे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला सदस्य किसन बोबडे, आनंद मेश्राम, मनोज काळे, सुभाष कुंडेकर, किशोर पिंपळशेंडे, नीळकंठ काकडे, तात्याजी नक्षीणे, महेंद्र ढवस, साईनाथ तुराणकार, रवींद्र बोबडे, लक्ष्मण दुर्वे उपस्थित होते. 

हे देखील वाचा:

शिंदोला माईन्स येथे शिवजयंती उत्सव साजरा

लॉकडाऊनचे नियम मोडल्याने आज 64 व्यक्तींवर कारवाई

Gadgebaba JayantiLead StoryShindola
Comments (0)
Add Comment