शिंदोल्या जवळ अपघात, दोन ट्रकची समोरासमोर धडक

विलास ताजने, वणी : वणी तालुक्यातील शिंदोला ते साखरा मार्गावर दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. यात दोन्ही ट्रकचे चालक गंभीर जखमी झाले. सदर अपघात दि.२३ बुधवारी रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास घडला.

ट्रक क्रमांक एम.एच. ३४ एव्ही ००६५ मध्ये कोळसा भरून वणीच्या दिशेला येत होता. तर ट्रक क्रमांक सी.जी. ०४ जेसी ९९२७ हा मुंगोली खाणीकडे जात होता. दोन्ही ट्रकची आदर्श विध्यालयाजवळील टेकडीच्या चढावर धडक झाली. या अपघातात एका ट्रकची कॅबिन पूर्णपणे तुटले. सदर घटनेची माहिती पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी शिरपूर पोलिसांना दिली.

Lead StoryShindola
Comments (0)
Add Comment